Saturday, September 11, 2010

एक घायाळ मधाळ हाक

एखाद्या पुस्तकाचं नाव / शीर्षक कसं सुचतं, ही एक गमतीची गोष्ट असते. प्रत्येक पुस्तकाच्या बाबतीत काहीतरी वेगळं घडतं. कुहूच्या बाबतीत सांगायचं तर मुळात कुहू हे या कादंबरीतल्या 'नायका'चं नाव होतं. कुहूची पहिली काही पानं मी लिहिली आणि ती लिहितानाच मनाशी हे पक्कं झालं की या कादंबरीचं देखील नाव कुहूच असेल. कारण कुहू हे या कादंबरीतलं केवळ एक महत्त्वाचं पात्र नाहीये, तर  ती एक वृत्ती आहे. त्यामुळे दुसरा काही पर्याय शोधायची गरजच भासू नये, इतकं हे नाव सुरुवातीपासूनच निश्चित झालं. मग ते वेगवेगळ्या कारणांनी अधिक आवडू लागलं. त्यातलं एक कारण होतं की 'कुहू' हा एक 'आवाज' आहे. त्या आवाजाला 'भाषे'चं बंधन नाही. जगातल्या कोणत्याही भाषेत 'कुहू' हा एक शब्द असू शकतो. कुहू या शब्दाला नाद आहे आणि त्यात गोडवाही आहे. 'ब्र' या उच्चारामध्ये धाडस अंतर्भूत आहे, तर 'कुहू' या उच्चारामध्ये आर्तता!. 
कुहू ही एक घायाळ मधाळ हाक आहे , माणसांच्या मनामध्ये प्रेम निर्माण करणारी!!





4 comments:

Amrut Damle said...

'ब्र' या उच्चारामध्ये धाडस अंतर्भूत आहे, तर 'कुहू' या उच्चारामध्ये आर्तता!.
कुहू ही एक घायाळ मधाळ हाक आहे , माणसांच्या मनामध्ये प्रेम निर्माण करणारी!!

एक-दोन अक्षरांच वर्णन, चार-पाच शब्दात करून तु कित्येक भावनांना उलगडून दाखवलस.

Chitra Rajendra Joshi said...

कविता,
’कुहू’ ह्या आवाजाला भाषेचं बंधन नाही हे तर अगदी खरं आहे.
पण ’कुहू’ ही काय वृत्ती आहे ते कादंबरी वाचूनच समजून घ्यावे लागेल ना?

मधुरा महाजन said...

ब्र आणि कुहू ह्या शब्दांचे किती छान वर्णन केलस तू कविता. खरचं, कुहुद्वारे तू कुठल्या वृत्तीवर प्रकाश टाकणार आहेस ह्याची उत्सुकता आहे.

girish mahajan said...

evhadi mothi zaleli kavitache baalman ajun jagrut aahe he tiche parikathanche prem pahunach lakshat yete. balpani aapan kiti niragas vichar karit hoto he janun ghenyasathi kuhoo lahanmothya sarvanich vachavi nave mi va maze sarva kutumb nakkich vachnar aahot he parat sangavese vatate.
Girish mahajan