Tuesday, September 14, 2010

अधिक रंगछटा आणि वेगळी दृश्यं

पक्ष्यांना माणसांपेक्षा अधिक रंगछटा दिसतात. तर मग कदाचित त्यांना दिसणारी दृश्यंही वेगळी असू शकतील.
मधमाशीला अतिनील किरण दिसतात, त्याची फिल्म मी पाहिली होती. फुलापानांच्या रेषा न् रेषा तिच्या नजरेतून स्पष्ट दिसत होत्या.
दृश्य वेगळे, रंगछ्टा अधिक वा वेगळ्या, आकलनाची पद्धत आणि गरज वेगळी... यांमुळे पक्ष्यांचे वर्तनही वेगळे होत असणार.
अ‍ॅब्नॉर्मल मानले जाणारे कलावंत आणि नॉर्मल मानली जाणारी व्यवहारी जगातली माणसं यांच्यातही असा काही फरक असेल का? मेंदूबाबत असे संशोधन सुरू आहे; पण डोळे-कान इत्यादी पंचेंद्रियांबाबत काय घडते याचा अभ्यास जगात कुठे सुरू आहे का?
इतरांना आपल्यासारखेच आणि आपल्याइतकेच दिसते, कळते, जाणवते, ऐकू येते, वाटते - असे सरसकट गृहीत धरले, तर त्यातून किती अकारण प्रश्न निर्माण होऊ शकतात.

2 comments:

Chitra Rajendra Joshi said...

कविता,
मला वाटतं माणसांमध्ये संप्रेरके महत्त्वाची भूमिका बजावतात. त्यांची निर्मिती, त्यांचा प्रवाह हे सारं माणसाच्या शरीर-मनावर आणि त्यामुळे वर्तनावर परिणामकारक ठरतं.
नॉर्मल माणसांमध्ये आणि अ‍ॅबनॉर्मल मानले जाणारे कलावंत ह्यांच्यातही त्यामुळे फरक पडतो का?
पक्ष्यांमध्ये असं काही असतं का?

Yeshwant said...

छान! अधिक वाढवायला हवं होतं.