Friday, October 29, 2010

पांगळ्याला पाय फुटावेत तसं वाटतं...

माणसांना भरभरून प्रेम करता आलं पाहिजे.
आणि त्यासाठी त्यांना सकारात्मक उर्जा लाभली पाहिजे.
जी उर्जा हिरवीगार पानं देतात, रंगबिरंगी फुलं देतात, पक्षी-प्राणी देतात. रंगाने, तजेल्याने, जिवंतपणाने... त्यांच्या नुसत्या असण्या-दिसण्यानेच आपली नजर बदलते. श्वासाची लय बदलते. त्वचेचा पोत बदलतो. मन बदलतं. सुंदर काही अनुभवलं की त्याचं प्रतिबिंब आपल्या आतबाहेर असं उमटतं. आपल्या डोळ्यांत, चेहर्‍यावर, सर्वांगावर झळकतं. आपल्या हालचालीतून, बोलण्या-वागण्यातून उमलून यायला लागतं. आपण सुंदर दिसायला लागतो. आपल्यातला कुरूप भाग आपल्याला जाणवतही नाही. त्या बटबटीत देठावर, त्याच्या बळावरच एक इवलंसं देखणं फूल उमलून निवांत झुलू डुलू शकतं. आपला सुगंध दूरवर पसरवू शकतं. फुलांचे हे निळे जांभळे लाल केशरी पांढरे पिवळे दिवे किती प्रकाश पसरवतात. इवल्या इवल्या अवकाशाचे तुकडे उजळवतात. प्रसन्न करतात. सांगतात की जग सुंदर आहे.
मग माणूस आपले शब्द, आपले रंग, आपले सूर, आपले स्पर्श वापरून आपल्या मनासह आपल्या आसपासचा अवकाश उजळवू शकत नाही का?
प्रेमात प्रचंड जादू असते.
प्रिय व्यक्तीचा खूप दूरवरून नुसता आवाज कानी पडला तरी पांगळ्याला पाय फुटावेत तसं वाटतं.
ही उत्कटता अनुभवायला माणसं का संकोचतात? प्रेम या नुसत्या शब्दानंही का आक्रसतात?
....................
कुहू सारखा एक इवला पक्षी मानुषी नावाच्या मानवी मुलीच्या प्रेमात पडतो, तेव्हा असे सारे प्रश्न त्याला पडणारच.

5 comments:

Mangala said...

कल्पनेपेक्षा वास्तव हे खूप अद्भुत असते,खूप सुंदर सांगीतले आहे आपण! पांगळ्याला पाय फुटतात ,खरच असच होते कविता ताई! आपला एक-एक शब्द इतका अर्थपूर्ण आणि सुंदर असतो,की पुन्हा-पुन्हा वाचावसं वाटते!

पराग वसेकर -- Parag Vasekar said...

'Kuhoo's Calligraphy makes sense now when I know little bit about Kuhoo and Manushi.

Lopamudraa said...

yes, manse, premat padayalaa ghabaratat, premat padalelyaalaa ghabaravataat, mokalepanane adbhut prem n anubhavata. chorun nako te karatat.. prem adbhut aahe je jag badalavu shakate.. swatachehi aani aaspass chya sagalyaanche...

Yeshwant said...

छान! नेहमीचचं पण तरीही छान वाटलं वाचायला.

Vrushali said...

khup sunder